
१३ महिन्यांच्या बाळासोबत मलेशिया ट्रिपचं प्लॅनिंग
बाळासोबत प्रवास करणं ही एक पूर्णपणे नवीन अनुभवाची गोष्ट असते. आईबाबा होण्यापूर्वी आमचं ट्रॅव्हलिंग अगदी मोकळं होतं – कधीही कुठेही जायचं, काहीही बघायचं! पण बाळ झाल्यावर प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक आणि प्लॅनिंगनं करावी लागते – आणि बॅकअप प्लॅन्स असणं फारच महत्त्वाचं ठरतं.
सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर आम्ही आमच्या बाळाच्या पहिल्या इंटरनॅशनल ट्रिपसाठी मलेशियाची निवड केली – आणि खरंच ही निवड परफेक्ट ठरली!
डेस्टिनेशन कसं निवडलं? (बाळासोबत प्रवास करताना विचार)
सगळ्यात मोठा प्रश्न होता:
“फ्लाइटमध्ये बाळाचं वागणं कसं असेल?”
म्हणून काही महत्वाचे non-negotiable निकष ठरवले:
- फ्लाइट ड्युरेशन – ५ तासांच्या आत असावी
- डायरेक्ट फ्लाइट – layovers टाळण्यासाठी
- नाईट फ्लाइट प्राधान्य – वायू रात्री चांगला झोपतो
- सिटी ऍक्सेस – जवळ हॉस्पिटल्स असलेलं शहर
- आयकॉनिक डेस्टिनेशन – एका प्रसिद्ध प्रतिमेनं ओळखता येईल असं
- व्हिसा झंझट नको – व्हिसा ऑन अरायव्हल किंवा फ्री व्हिसा
आधी दुबईचा विचार केला होता – सगळ्या निकषांवर बसत होतं, पण ऑगस्टमध्ये तिथलं उष्ण हवामान लहान बाळासाठी योग्य नव्हतं. शेवटी मलेशिया ही परफेक्ट निवड ठरली – व्हिसा ऑन अरायव्हल, डायरेक्ट फ्लाइट्स आणि बाळानुसार प्लॅनिंग करता येईल असं वातावरण.
बाळासाठी राहण्याची निवड (Airbnb का निवडलं?)
१३ महिन्यांचा वायू अजूनही आपल्यासारखा रेस्टॉरंटमधलं जेवण खात नाही. त्यामुळे स्वयंपाक करता येईल अशी जागा हवी होती. म्हणून Airbnb हा बेस्ट पर्याय वाटला:
- किचन ऍक्सेस – बाळाचं जेवण बनवता येईल
- मोकळी जागा – वायूला रांगता/खेळता येईल
- सेंट्रल लोकेशन
- परवडणारी किंमत
- सगळी गरजेची सोय – वॉशिंग मशीन, Wi-Fi इ.
शिफ्टिंग आणि उगाच सगळं पुन्हा पुन्हा अनपॅक करावं लागू नये, म्हणून मुख्य मुक्कामासाठी एकच Airbnb बुक केला – Bukit Bintang, Kuala Lumpur इथं.
Airbnb लिंक: The VIEW – 1 BR. Suite with Amazing Views and Pool
एक स्पेशल स्टे – ट्विन टॉवर्स व्ह्यूसाठी!
आम्ही Petronas Twin Towers समोर एक दिवस लक्सरी स्टे करायचं ठरवलं – आणि हे एकदम worth it होतं!
Link: Imperial KLCC by Opus Hospitality
हे स्टे देखील बाळ-फ्रेंडली, सेंट्रल लोकेशन आणि आवश्यक सुविधांनी भरलेलं होतं.
लंगकावीमधील स्टे (Langkawi Stay)
लंगकावीमध्ये स्टे शोधणं थोडंसं कठीण ठरलं. बऱ्याच सेंट्रल आणि परवडणाऱ्या ठिकाणी किचन नव्हतं. लक्झरी रिसॉर्ट्स होती, पण खूप महाग आणि टाउनपासून लांब.
शेवटी, Wings Resort बुक केलं – जे Langkawi International Airport च्या अगदी शेजारी आहे.
परफेक्ट लोकेशन – अगदी सहज येता जाता येईल.
Link: Wings by Croske Resort Langkawi
त्यानंतर एक रात्र Ramada Langkawi मध्ये देखील थांबलो – मुख्यतः सुंदर व्ह्यू साठी!
“हे व्ह्यू पाहाच!”
Link: Ramada by Wyndham Langkawi Marina
खाण्याची व्यवस्था (बाळासाठी आणि आपल्यासाठी)
वायूसाठी:
- ब्रेकफास्ट – Airbnb मध्ये बनवलेला घरचा
- हॉटेलमध्ये – डोसा किंवा अंडी (बफे मधून)
- लंच आणि डिनर – घरी बनवलेली डाळ-खिचडी
- शक्य नसताना – घरी बनवलेलं रागी/सेरेलेक
- एमर्जन्सीसाठी – Slurrp Farm चे इंस्टंट बेबी फूड (फक्त गरम पाणी घालायचं!)
- ट्रिपला जाताना थर्मास आणि भांडी नेहमी सोबत घेतली
आमच्यासाठी:
- ब्रेकफास्ट – Airbnb मध्ये किंवा काही वेळा शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये
- डिनर – मुख्यतः Grab App (Uber Eats सारखं) वापरून
- KL मध्ये Indian/Asian रेस्टॉरंट्स भरपूर आहेत, पण बाळासोबत बाहेर जेवणं थोडं कठीण होतं
- Batu Caves सारख्या टुरिस्ट ठिकाणी pav bhaji आणि dosa मिळाले!
- Wings Resort आणि Ramada मध्ये सुद्धा साधं इंडियन फूड मिळालं – वायूलाही आवडलं
प्रवास करताना – बेबी गिअर & टिप्स
Must-have गिअर:
- स्ट्रोलर – बहुतेक ठिकाणी उपयोगी
- बेबी कॅरियर – गर्दीच्या ठिकाणी उपयुक्त
स्ट्रोलर खरेदी लिंक: StarAndDaisy Baby Strollers
कॅरियर लिंक: LuvLap Comfy Plus Newborn Baby Carrier
लोकल ट्रॅव्हल:
- बहुतेक रेस्टॉरंटमध्ये हाई चेअर्स होत्या
- रस्ते आणि फुटपाथ्स स्ट्रोलरसाठी योग्य
- सगळ्या कॅब्स Grab App वरून बुक केल्या
टीप: सामान आणि स्ट्रोलर असल्यास ६-seater कॅब बुक करा – आरामदायक आणि spacious
आमचं ओरिजिनल Itinerary होती पण त्यातबाळानुसार आम्ही केले बदल
आमचं एक ठरवलेलं itinerary होतं, पण ते पूर्ण वेळ फॉलो करायला जमलं नाही – कारण toddlers unpredictable असतात! दररोज वायूच्या मूडनुसार प्लॅन बदलावे लागले – फ्लेक्सिबिलिटी ही खूप महत्त्वाची ठरली.
टीप: बाळाची मुख्य अॅक्टिव्हिटी रोजच्या प्लॅनमध्ये ठेवा – खेळायला वेळ मिळाला पाहिजे.
Learnings & Tips (महत्त्वाचे धडे)
- Flexible flights – डेट चेंज किंवा कॅन्सलेशन फी कमी असणाऱ्या
- Travel Insurance – बंधनकारक नसली तरी highly recommended
- फ्लेक्सिबल रहा – तुमचं बाळच दिवस ठरवणार
- Playtime द्या – बाळासाठी एक्सप्लोर आणि खेळायला वेळ ठेवा
- Sightseeing लिमिट ठेवा – दिवसाला जास्तीत जास्त १-२च अॅक्टिव्हिटीज
एक खास निरीक्षण – ‘बाळ लहान असलं तरी प्रवास थांबत नाही’
आम्ही पाहिलं की बरेच वेस्टर्न टुरिस्ट अगदी लहान बाळासोबत ट्रॅव्हल करत होते – त्यांच्या संस्कृतीत हे सामान्य आहे.
तुमचं बाळ कितीही लहान असलं, ते नेहमी लहानच वाटणार – पण त्यासाठी प्रवास थांबवायची गरज नाही.
Photo Dump !

















#TravelWithBaby #MalaysiaTrip #ToddlerTravels #मराठीजोडी
