You are currently viewing युद्ध जिवांचे-Book review

युद्ध जिवांचे-Book review

सध्याच्या उध्दभवलेल्या संकटामुळे आणि बराचसा घरी वेळ मिळाल्यामुळं हे पुस्तक वाचायचं ठरवलं. तसं वाचण्याच्या भल्या मोठ्या पुस्तकांच्या यादीमध्ये याच नाव होतंच परंतु इतक्या लवकर नव्हतं.पण करोना ने ते करायला भाग पाडलं.

घरातून बाहेर पडायचं नाही म्हणून ऍमेझॉन वरून पुस्तक मागवलं आणि अगदी ठरलेल्या वेळेत आलं.डिलिव्हरी बॉय कडून हाती घेतल्यावर बाहेरील पॅकेज पण साबणाने थोडं ओलं करून निर्जंतुकीकरण करून घेतलं.

मुळात अशी बायलॉजिकल वेपन्स ची गरज च कशी भासली यापासून या पुस्तकाचा  प्रवास चालू होतो तो अगदी अलीकडच्या स्वाईन फ्लू पर्यंत! अगदी इसवीसनपूर्व ४२४ मध्ये झालेल्या स्पार्टाच्या लढाईत पण हि अस्त्रं वापरली गेली होती.

दुसऱ्या महायुद्धात याचा कसा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला याची ज्वलंत वर्णने या पुस्तकात आहेत.त्याआधी अगदी तेराव्या शतकात प्लेग कसा जाणीवपूर्वक पसरवला गेला हे लेखकाने सांगितले आहे.आताचा vaccin हा शब्द मुळात आलाच कुठून, कुणी शोधून काढला याची एकदम तपशीलवार मांडणी आहे.

एखाद्या साथीच्या आजाराने  मेलेल्या मृतदेहाला ज्याला कोणताही कोणता आजार नाही अश्या आरोपीला बांधलं जायचं आणि हळहळू त्याला मेलेल्या माणसाची बाधा व्हायची आणि तो खंगून खंगून मारायचा एकटा ! ना त्याला कोणी बघायला यायचा ना विचारायला.हि अशी युरोपात शिक्षा होती.अशी कितीतरी वर्णने  वाचून अंगावर काटा येतो.असं वाटतायला लागतं आपण भारतीय एकूणच विचार करता खूप सज्जन आहोत.आपल्याला आतापर्यंत  हिटलर खूप क्रूर होता असे बिंबवलं गेलं पण त्यापेक्षाही क्रूर जपानी राज्यकर्ते होते.इंग्लंड ,अमेरिका हेही तितकेच क्रूर! मुक्के प्राणी,झाडी, जमिनी यांची  अक्षरशः कत्तली झाल्या यांच्या जीवस्त्रांच्या  प्रयोगासाठी!

जपानी सम्राट हिरोहितो ,जनरल शिरो इशी यांसारख्यानी कसे जिवंत माणसांना; न भूल देता फाडून रसायन कसे शरीरात बाधा करतं हे पाहिलं. अश्या  कितीतरी अमानुष पद्धती त्यांनी अवलंबवल्या अशी अनेक उदाहरणे यात आहेत.

टॅमीफ्लू सारखे औषध आणि त्यामागचं अर्थकारण,राजकारण हे विविध अंगानी सांगितले आहे.एकूणच अश्या विषाणूमुळे कश्या मोठंमोठ्या केमिकल कंपन्यांचं किंबहुना पडद्यामागील राज्यकर्त्यांचं कसं भलं होतं हे समजावून सांगितलं आहे.

शेवटी काही आंतरराष्ट्रीय करारानुसार हि जैविक आणि रासायनिक अस्त्रं नष्ट करण्यासाठी कशी समुद्राच्या पायथ्याला सोडली गेली आणि आजकाल कुठंतरी धोकादायक आहेत असेही नमूद केलंय.

मला मिळालेली पुस्तकाची आवृत्ती हि सातवी म्हणजे फेब्रुवारी २०२० ची.पुस्तकाच्या शेवटी प्रत्येक चॅप्टर साठी लेखकांनी वापरलेली references आहेत.

अजून खूप काही गोष्टी,संदर्भ नेमकी आकडेवारी या पुस्तक आहे.प्रत्येकानी सध्यस्थितीत हे आवर्जून वाचावे असे पुस्तक.

कुठेही बाहेर न जाता खालील लिंक वर क्लिक करून हे पुस्तक मागवता येईल.

https://amzn.to/2WyfBMf