You are currently viewing जलोरी पास सायकलिंग expedition

जलोरी पास सायकलिंग expedition

“सर,येणार काय हिमालयीन सायकलिंग expedition ला?” अभिजित ने ऑफिस मधेच विचारले.क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो “जाऊया!”Adventure म्हंटलं कि मी सदैव तयार असतो.बेसिक इन्फॉर्मशन घेऊन मी ऑफिसच्या कामात गुंतलो.युथ हॉस्टेल सोबत ट्रेकिंग वा ऍक्टिव्हिटी करण्याची संधी आयती चालून आली होती.

निघण्याची तारीख जवळ येत होती.मी पूर्वीपासून सायकलिंग साठी खूप excited होतो.माझ्या ऍमेझॉन च्या कार्ट मध्ये बराचश्या सायकलिंग रिलेटेड accessories पडल्या होत्या.पण फायनल ऑर्डर दिली नव्हती.तसेही आता ऑर्डर देऊन काही उपयोग नव्हता;कारण डिलेव्हरी मी जलोरी पास ला पोचल्या वर झाली असती कदाचित! म्हणून आदल्या दिवशी घाटकोपरच्या Decathlon मध्ये गेलो.काय घ्यायचं आधीच ठरलं असल्यामुळं मुळे फटाफट एका तासात शॉपिंग आटोपली

तत्पूर्वी त्या दिवशी ऑफिस मध्ये ‘Safe Structure ‘ नावाची miniature मॉडेल बनवण्याची कॉम्पिटिशन होती.मी भाग घेतला होता आणि सुदैवाने म्हणा कि दुर्दवाने आमच्या ग्रुप चा लीडर मीच होतो.माझं अर्ध लक्ष रुटीन प्रोजेक्ट वर्क वर ,थोडं सायकलिंग च्या  शॉपिंगवर आणि  राहिलेलं थोडं लक्ष कॉम्पिटिशन वर होतं.कुणीतरी पृथ्वी एवढ्या आकाराचा हातोडा करून माझ्या डोक्यावर ठेवलाय अशी अवस्था झाली होती!

 निघण्याच्या दिवशी बॅग भरण्यासाठी मी ऑफिस ला दांडी मारली.संध्याकाळी 6 ची flight होती मुंबईहुन दिल्ली साठी.लक्ष्मीथ,मी,अभिजित आणि अजिंक्य उबेर ने एअरपोर्ट ला पोचलो;तिथे आदित्य आणि अशोक आम्हाला जॉईन झाले.सगळ्या formalities कंप्लिट करून airport lounge मध्ये बसलो.मग सेल्फी स्टिक ने सेल्फी काढून फेसबुक वर चेक इन करून ‘going फॉर हिमालयीन सायकलिंग ;फीलिंग excited’ चा कार्यक्रम पार पडला;तितक्यात flight 45 मिनिट्स लेट झाल्याचं कळले. ट्रिप जास्तच adventurous होणार याची चुणूक आत्ताच आली.वेळ घालवण्यासाठी KFC मध्ये जाऊन चिकनच्या लेग piece वर ताव मारला.

 दिल्ली एअरपोर्ट वर AHA टॅक्सिस वर आधीच बुक केलेली कार आम्हाला न्यायला आली होती.बॅगा कॅरेज वरती बांधून ,गाडी मनाली च्या दिशेने सुसाट निघाली.श्रीवास्तव;Chevrolet Enjoy चा ड्राइवर इस्कॉन चा भक्त निघाला.त्याने कार मध्ये वेगवेगळ्या foreign लोकांच्या आवाजातील ‘हरे राम हरे राम ,राम राम हरे हरे’ चे चॅटिंग चे music लावले.थोडं गप्पा गोष्टी करून मी माझा मोबाईल कनेक्ट केला आणि माझ्या मोबाईल मधली गाणी चालू केली.वेगवेगळ्या गाण्यांच्या ट्रॅक ने ड्राइवर सहित सर्वजण मूड मध्ये आले.सोनिपत,पानिपत,कर्नाल,चंदीगड क्रॉस करून हिमाचल च्या बॉर्डर ला गाडी लागली. हायवे वर नॉन-व्हेज ढाबा शोधून,थकून शेवटी रात्री एक वाजता व्हेज धाब्यावर गाडी थांबवली.”यहाँ सब व्हेज मिलता है साबजी” श्रीवास्तव हसत बोलला.

रात्रभर गाणं ऐकत,गप्पा रंगल्या होत्या.मोदी पासून ते राज ठाकरे आणि बरेच विषय.राज ठाकरेंबद्दल तिकडच्या लोकांमध्ये अजूनही कुतुहूल होते.बाळासाहेबांना तर खूप चांगलं बोलतात हे ड्राइवर च्या बोलण्यातून जाणवलं.कोणत्याही ट्रिप मध्ये ड्राइवर ला खुश ठेवणं हे मी परम कर्तव्य मानतो. साधारणतः सकाळी एक तास झोप झाल्यावर थंड हवा,मंद पाऊस आणि मख्खन वाल्या रोड ने मला उठवलं.मला सगळं डोळ्यात सामावून घ्यायचं होतं,सकाळचे अंदाजे ६ वाजले होते.इतकं स्वच्छ ,प्रसन्न वातावरण होतं झोप कुठल्या कुठे पळून गेली.भाक्रा नांगल डॅम चा तो परिसर होता.चहा साठी एक स्टॉप घेऊन डायरेक्ट गाडी हिमाचल मधील औत (3500 ft from MSL)  ला थांबवली.

Aut base camp

रीतसर रिपोर्टींग करून basement च्या रूम मध्ये सेटल झालो. हळूहळू बाकीचे participants पण join झाले.17 जण भारताच्या विविध भागातून आले होते. समवयस्क असल्याने सगळ्यांशी चांगली ओळख झाली.लागलीच  JP-6 नावाचाwhatsaap group तयार झाला.(जलोरी पास -batch 6).

Manali road

बेस कॅम्प म्हणजे 3 मजली छोटी इमारत होती. ग्राउंड वर मेहक ड्रायफ्रूट नावाचे रेस्टॉरंट कम दुकान होते.पहिल्या मजल्यावर मुलींच्या रूम्स आणि YHAI (Youth Hostel Association of India) च्या लोकांची राहायची जागा. Basement मधल्या रूम्स मध्ये सर्व मेल participants! समोर मनाली ला जाणारा वर्दळीचा रोड मागे बियास नदी वाहत होती आणि चारहि बाजूना मोठाले डोंगर!

Beas River

दुपारचं जेवण आवरून औट गावात फेरफटका मारला.ऊन पडलं असलं तरीही खूप थंडी वाजत होती. छोट्या टपरी वरचे आलू टिकी, सामोसा खाण्याचा मोह टाळता नाही आला.ब्रिज वर थोडी फोटोग्राफी करून मनाली रोड च्या शनी मंदिरात जाऊन आलो.रात्री कॅम्प फायर चा social gathering होते.संपूर्ण हिमाचल प्रदेश मध्ये bonfire ला बंदी आहे. तर YHAI वाल्यांची कॅम्प फायर म्हणजे  मोबाईल मध्ये टॉर्च लावून मोठयाने सगळे ओरडणे ‘फायर फायर कॅम्प फायर’.मग इतर batch शी ओळख,कुणी काही परफॉर्मन्स केलं तर ते पाहायचं असा कार्यक्रम होता. मी आणि आदित्य ने”सोनू तुला सोन्याची माळ घे” हे अस्सल मराठी ठसक्याचं गाणं म्हंटल.गप्पा गोष्टी करून झाल्यावर एक मात्र पक्के समझलं कि प्रत्येक adventure कॅम्प मध्ये पुण्या-मुंबई ची मराठी लोक खूप असतात.दुसऱ्या दिवशीचे timetable समजून घेऊन;दूध bournvita पिऊन झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे 6 वाजता आम्ही वॉर्म अप exercise साठी शनी मंदिरात जमलो. झीरमिर पाऊस चालू होता.पावसात स्ट्रेचिंग exercise करायला मजा आली. जवळपास 2 तास विविध प्रकारचे योगासन, breathing exercise करून झाल्यावर आज सायकलिंग ला निघणाऱ्या JP-5 batch ला see off करायला जमलो.तोवर पावसाचा जोर वाढला होता. सगळे  तयार होते निघायला पण तुफान पावसामुळे त्यांना निघता येत नव्हते. अखेर पाऊस थांबला आणि ते गेले;तसे आम्ही ब्रेअफास्ट साठी बेसमेंट मध्ये पळून आलो.पोटभरून नाश्ता केल्यावर तासाभराने छोटाश्या ट्रेक साठी जायचं होत.औट मार्केट मधून वरती जायचा रस्ता होता.लोकल लोक पाहत, घर ,राहणीमान निरखून हिल्स वर चढायला 

Aut village view

लागलो. जाताना खूप घरे  लागली .हिमाचल प्रदेश मध्ये जवळपास सर्वच हिल्स वर अगदी टॉप पर्यन्त लोक राहतात. 45 मिनिट्स पेक्षा जास्त चालून टॉप पॉईंट ला पोचलो.वाटेत सेल्फी, फोटोग्राफी ,विडिओ शूटिंग चालूच होतं.वरून दिसणारे  दृश्य डोळ्यांना सुखावणारे होते. लहानपणी चित्रकलेच्या तासाला दोन डोंगर, त्यामधून येणारी नदी, वर उडणारे दोन पक्षी, खाली घर असे नेहमी रंगवणारं चित्र समोर दिसत होत. जुन्या आठवणीने आणि समोर दिसणाऱ्या मनमोहक दृश्याने मन एकदम फ्रेश झालं.

दुपारी  बेस कॅम्प ला लंच केलं. लागलीच सायकल, सेफ्टी गियर्स , हेल्मेट अश्या गोष्टी मिळाल्या. साधारणतः 4 वाजले असतील कॅम्प लीडर ने सायकल कशी चालवायची, गियर सिस्टिम, इतर काही महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि आम्ही टेस्ट राईड साठी निघालो.कितीतरी वर्ष्यातून मी सायकल चालवत होतो, गियर असलेली सायकल तर आयुष्यात पहिल्यांदाच ! जवळपास 8 km ची राईड करून आम्ही बेस कॅम्पला परतलो. प्लेन रोड वर सुसाट सायकल चालवली, टॉपमोस्ट गियर वर जवळपास 80km/hr स्पीड चा थ्रिल अनुभवला .टेस्ट राईड केल्यावर कधी एकदा उद्या चा दिवस उजडतोय आणि जलोरी पास ला निघतोय असे झालं. संध्याकाळी रूमवर पत्त्यांचा डाव चांगलाच रंगला.

Time pass in room
Understanding Technical things
Practice Ride

शेवटी तो दिवस उजाडलाच! अगदी खूप जरुरीचे कपडे आणि साहित्य सायकल वर लावायच्या बागेत टाकलं ;राहिलेलं साहित्य दुसऱ्या बॅगेत ठेवून ती कॅम्प लीडर कडे जमा केली. ब्रेकफास्ट, चहा घेऊन आम्ही रेडी झालो. सोबत दुपारचं जेवून बांधून घेतलं.’गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष झाला आणि एक एक करून सगळ्यांची स्वारी निघाली जलोरी पास जिंकायला!


22km सायकलिंग करून आम्हाला फागुपुल कॅम्प(4000 ft from MSL) ला पोचायचे होते.रस्ता तसा डांबरी होता. स्वच्छ ऊन होतं. हलका चढ होता पण हवेत मस्त गारवा होता. डांबरी रस्ता आणि तिर्थन नदी समांतर जात होते त्यांच्या मध्ये मी आणि माझी सायकल लुडबुड करत होतो.या सगळ्यांच्या दोन्ही बाजूला मोठमोठाले डोंगर उभे राहून आम्ही मांडलेला खेळ बघत होते. पाईन चे घनदाट जंगल, बर्फाच्या पाण्याची आवाज करत वाहणारी नदी सगळं जग विसरायला लावत होते. हवेत कमालीचा नशा होता त्यात मी पार बुडालो होतो.Route वर कॅम्प लीडर आणि मेकॅनिक मोटार सायकल वर ये जा करत होते- कुणाची सायकल पंक्चर झाली वा इतर काही आपत्कालीन मदतीसाठी.दुपारी 1 वाजल्यानंतर साधारण सफई जागा पाहून जेवणाचे डब्बे उघडले.फागुपुल कॅम्प फक्त 5 km वर होते;म्हणून जेवल्यावर एक डुलकी काढली.बोअर व्हेल चे थंड पाणी पियुन; थोडंस तोंडावर मारून सायकल वर बसलो.अंदाजे 3.30 वाजता फागुपुल कॅम्प ला पोचलो. तिथे तीन  मोठे टेंट होते;सुदैवाने आमच्या ग्रुप मध्ये मुलगी नसल्यामुळे आम्हाला सगळे टेंट वापरायची मुभा होते शिवाय बाकी कोणतेही बंधनं नाहीत; राजेशाही थाट एकदम!थकवा घालवण्यासाठी नदीवर अंघोळी ला गेलो. थेट बर्फाच्या पाण्यात आंघोळ करायला डेरिंग लागतं. जवळपास एक तास पाण्यात लोळून;फ्रेश होऊन आजूबाजूचा परिसर जाणून घेण्यासाठी फिरायला निघालो. लोकल लोकांशी गप्पा मारल्या.तिथलं लोकं खूप साधी आणि मनमोकळे ! मुली तर एवढ्या सुंदर, हसऱ्या ;पाहताक्षणी प्रेमात पडावे अश्या! बहुतांश लोक थोडं फारच काम करतात. कुणी स्कुल टीचर तर कुणाचं छोट हॉटेल वा दुकान. कुणी शेती पिकवून ते स्वतःच खातात तर कुणी विणकाम सारखी छोटी-मोठी कामं करतात. कोणत्याही जास्त अपेक्षा नाहीत,कसलीही हाव नाही ;जे आहे त्यात आनंदी!एका छोट्या टेकडीवर चढूण जाऊन बसलो. तिथून दिसणारे  दृश्य तर खूप शांत आणि मुग्ध करणारं होत. तिथे अर्धा तास सर्वजण शांत बसून समोर दिसणारं दृश्य फक्त डोळ्यात सामावत होते.

Fagupul camp
River stream behind Fagupul camp

पुढच्या दिवशी जीभी कॅम्प(6000 ft from MSL) ला जायचं होतं.10 km चे अंतर पण सर्व 45 degree चढण.गणपती बाप्पा ला स्मरण करून पेडलिंग स्टार्ट केलं. पहिल्या पेडल पासून ते शेवटच्या पेडल पर्यंत height वाढत होती. बंजार गावाच्या ट्रॅफिक मधून वाट काढत आम्ही जात होतो. खूप स्टॉप घेतले; electral पावडर, ग्लुकोन डी ची नुसता खैरात.

See the road terrain towards Jibhi
A lot of hairpin bends

जसजसे जीभी कडे जात होतो तसतशी थंडी वाढत होती.थकून, exhaust होऊन शेवटी 3.30 वाजता जीभी कॅम्प ला पोचलो.जीभी कॅम्प सगळ्या कॅम्प मध्ये बेस्ट आहे असे ऐकून होतो आणि ते खरे होते. कॅम्प ची मोठी जागा होती ,चारही बाजूला डोंगर आणि घनदाट उंचच उंच झाडी. इथेही खळखळ वाहणारी नदी.कसेही कोणतेही फोटो काढा ते वॉलपेपर फ्रेम वाले येणारे!आजूबाजूला काही रिसॉर्ट टाईप गेस्ट हाऊस होते.थोडं रेस्ट करून धबधब्याखाली अंघोळीला गेलो.जास्त उंची वरून पाणी पडत नव्हतं पण पाणी एकदम थंड होतं; freezing! धबधब्याखाली जायचं 

Beautiful Jibhi camp
Faces after having bath under freezing water

डेरिंग होत नव्हतं पण शेवटी काय होईल ते होईल असे म्हणून गेलो तर 20 सेकंदात बाहेर आलो;सगळं सुन्न झालं होतं; मेंदूचा रक्तप्रवाह थांबलय असे वाटत होतं. मग थोड्या उड्या मारून, स्वतःला warm करून परत पाण्यात गेलो.तरीही जास्त वेळ पाण्यात न राहता बाहेर यऊन अंग पुसून कोरडा झालो. नंतर मात्र एकदम फ्रेश वाटलं.पाण्याचा मार लागल्यामुळे सगळा थकवा गेला होता.तिथं परत लोकल परिसर एक्सप्लोर करून संध्याकाळी चिली चिकन ची ऑर्डर दिली.लंच वर ताव मारून sleeping बॅग मध्ये शिरलो. Sleeping sheet, मग sleeping बॅग, वरती दोन ब्लँकेट असे layers वाढवून थंडी पासून थोडी सुटका मिळत होती.उद्या expedition चा सर्वात अवघड  दिवस होता म्हणून लवकर उठून लवकर निघण्याच्या उद्देशाने लगेच झोपी गेलो.


सोझा ला(8400 ft from MSL) जायचा दिवस उजाडला!8 km चा प्रवास होता.सर्वजण लवकर उठून तयार होते.अवघड रस्ता असल्यामुळे सर्वजण थोडं टेन्शन मध्ये होते तर कुणी “मी सायकल वरून उतरून;ती चालवत नेणार” असे आधीच जाहीर करून हार मानलेली होती.

बाप्पा चा जोर जोरात जयघोष करून आम्ही निघालो.एक किलोमीटर संपल्यावर पूर्ण मातीचा,खड्डे आणि दगडे असलेला कचा रास्ता सुरु झाला .इथून खरी कसोटी सुरु झाली.एकापाठोपाठ 45 डिग्री चढण विथ हेअरपिन बेंड असणारा रस्ता.१ ,२ ,३ …असे मी टर्न मोजत होतो पण शेवटी मोजमाप सोडून दिल.एक टर्न पार करायला १०-१० फुटावर थांबावे लागत असे,शिवाय दगडी गोट्यांमुळे सायकल घसरत होती.

Road towards Sojha camp
Cycling on offroad

कधी फक्त सायकल चे पुढचे टायर automatically वर उचलायचं ,लग्नात घोडा कसा पुढचे पाय उचलतो तसे.असे वाटत होते कधी संपतोय हा रस्ता.एनर्जी कमी पडत होती.थांबत होतो,ग्लुकॉन डी पित होतो,रेस्ट करत होतो.पण फक्त पेडलिंग करत सायकल न्यायची असे पक्क केलं होतं.जोराची थंडी सुटली होती,कोणताही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण होत होते.आतापर्यंतचे हौशी फोटोग्राफर थंड पडले होते.सगळे या विचारात होते.”यार कब खतम होगा ये रस्ता?” लंच नंतर पाऊस चालू झाला .शेवटचे काही किलोमीटर प्लेन रोड मिळाला आणि 2 वाजता सोझा कॅम्प ला पोचलो.

Sojha camp

Sojha Camp

सोझा कॅम्प तर एकदम दरीच्या काठावरती होते.टेरेस मधून अप्रतिम view दिसतो.आपल्या खाली ढग आणि आपण वरती! एवढी थंडी होती कि हात पाय कापायला लागले होते.दुपारचे 2 वाजले असे वाटतच नव्हते.आमच्या आग्रहास्तव कूकने बटाटा आणि वांग्याचे पकोडे बनवून दिले होते .समोरचे मनमोहक दृश्य ,हातात चहा,पकोडे असे अप्रतिम मिलाप झाला होता.थोडा अराम करून लोकल फेरफटका मारायला निघालो.सोझा गाव अगदी छोटं होते.4 -5 हॉटेल्स आणि गेस्ट हाऊस आणि 2-4 घरे.एका हॉटेल मध्ये जाऊन ऑम्लेट पाव खाल्लं.हॉटेल वालीला पाव म्हणजे काय हे कळत नव्हते.त्यांना जास्त हिंदी येत नव्हतं किंवा तिकडे पाव हा प्रकार माहित नसेल किंवा त्याच दुसरं नाव असेल. तर तिला ऑम्लेट के साथ “जो देते हो वो देदो “असे बोलल्यावर तिने ब्रेड आणून दिला.रूम मध्ये आल्यावर एवढी थंडी होती कि आम्ही ब्लॅंकेट मध्ये लपेटून घेतलं स्वतःला.रात्री जेवून शिस्तीत सर्वजण झोपून गेले.

Sojha village


 
दुसऱ्या दिवशी जलोरी पास(10500 ft from MSL)या सर्वात उंच पॉईंट वर ट्रेक करत जायचं होत.10 km च अंतर होतं.वरती गेल्यावर सेरॉलसार लेकला परत एकूण 10 km चालायचे होतं म्हणून सर्वानी कार ने जलोरी पासला जायचं ठरवलं.सकाळी 7 वाजता आम्ही जलोरी पास या टॉप पॉईंट ला पोचलो.तिथला view  तर अचंबित करणारा होता.chilling हवा,दूरवर मोठे डोंगर ,ढगांवर आम्ही तरंगत आहे असे वाटत होते. हात पाय थरथरत होते थंडीने.Expedition चा शेवटचा पॉईंट जिंकल्याची भावना सगळ्यांच्यात होती .तिथे आम्ही पोटभरून गरम गरम मॅगी खाली आणि लेक साठी जंगल ट्रेल चालू केला.लेक पाहून चहा घेऊन लगेच परतीचा मार्ग पकडला कारण आम्हाला 11.30 ची बस पकडायची होती सोझा ला जायला.

View from Jalori Pass
Trail towards Serolsar Lake
Serolsar Lake

सोझा ला येऊन लंच करून लगेच जिभी साठी रवाना व्हायचं होत.आता पुढचा प्रवास एकदम सोपा होता पण तितकाच रिस्की होता.Without पेडलिंग सायकल खाली जाणार होती.फुल्ल उतारावर सायकल आपोआप पळणार होती.दोन्ही हात ब्रेकवर ठेवून सायकल चा स्पीड कंट्रोल करायचा नाहीतर डायरेक्ट दरीत! ज्या अंतराला वरती यायला 5 तास लागले ते अंतर आम्ही 30 मिनटात कव्हर केलं.सलग ब्रेक पकडून हात दुखत होते.जिभी ला आल्यावर अंघोळ करायची खूप इच्छा झाली पण परत त्या धबधब्याखाली जायचं डेरिंग अजिबात होत नव्हते. शेजारच्या हॉटेल मध्ये 30 रुपये देऊन गरम पाण्याची अंघोळ करता येते असे कळले.तर लागलीच मी गेलो कपडे घेऊन अंघोळीला!तिथे मला एका सुंदर मुलीने अंघोळीचे गरम पाणी आणून दिले.तिथे बहुतांश बायकाच हॉटेल च्या मालकीण असतात.तिचा तो पाणी देताना लाजलेला चेहरा मला अजूनही लक्षात आहे.

पुढच्या दिवशी संपूर्ण आराम होता.राहिलेलं किलोमीटर्स बेस कॅम्प पर्यंत कव्हर करायचे होते.बेस कॅम्प ला पोचून सर्व formalities संपवून आम्ही मनाली ला एक दिवस फिरायला जाणार होतो.म्हणून दोन तासात सायकल औट ला पोचवली.Certificate मिळाल्यावर आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि मनालीला निघालो.हात,पाय सर्व अंग दुखत होत. कोणत्याही टणक sarface वर बसायची इच्छा होत नव्हती.

End of this wonderful cycling journey

मनाली ला आम्ही paragliding केलं.आधी बंजी जम्पिंग केलं असल्या मुळे भीती तर अजिबात वाटली नाही पण मस्त पक्ष्याप्रमाणे हवेत उडतोय असे वाटले.मन प्रसन्न झालं.मॉल रोड वर शॉपिंग करून हडिंबा मंदिर पाहून रात्री दिल्ली साठी बस पकडली.दिल्ली मध्ये एका मित्राकडे फ्रेश होऊन तिथे परत थोडी शॉपिंग केली.त्यामुळे एअरपोर्ट वर जायला उशीर  झाला.flight चं चेक इन आणि बोर्डिंग बंद झालं होतं,मी कसेबसे तिथल्या officials  ना विनंती  करून flight चे  बोर्डिंग पास मिळवले.अख्या दिल्ली एअरपोर्ट वर मी गेट शोधण्यासाठी पळत होतो.घामाघूम होऊन कसाबसा शेवटी सीट वर जाऊन बसलो! नशीब नाहीतर 8000 रुपयाचा चा फटका बसला असता.

तितक्यात ऑफिस मध्ये झालेल्या competition चा निकाल लागल्याची बातमी कळाली.आमची टीम जिंकली होती.द्विगुणित झालेला आत्मविश्वास घेऊन असामी मुंबई एअरपोर्ट वर लँड झालो.